सारथी मार्फत पीएचडी साठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना सरसकट द्यावी.
कोल्हापूर प्रतिनिधी : सारथी संस्थेमार्फत पीएचडी शिक्षण घेणाऱ्या मराठा व कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येते महाविकासआघाडी व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा जितके विद्यार्थी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांना सरसकट व पीएचडी कन्फर्मेशन तारखेपासून शिष्यवृत्ती देण्यात येत होती. यावर्षी सरकारने शिष्यवृत्ती सरसकट न देता फक्त दोनशे विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरीब मराठा समाजातील अनेक उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे अनेक विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहातून मागे पडतील, आधीच नोकरीमध्ये आरक्षण नसल्यामुळे मराठा तरुण नैराश्यात आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. हा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय युवा सेना कदापी सहन करणार नाही आपले महायुती सरकार जाणून-बुजून मराठा समाजाला शैक्षणिक प्रवाह पासून लांब करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर 15 नोव्हेंबर 2023 च्या आधी पात्र सर्व विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन तारखेपासून पीएचडी शिष्यवृत्ती सरकारने जाहीर करावी, अन्यथा युवासेना विद्यार्थ्यांसह लोकशाही मार्गाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर आंदोलन करेल.असा इशारा युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी दिला आहे.

Comments
Post a Comment