शिवसेना शिंदे गटाचे धक्कातंञ..अनेक दिग्गजांचा पक्ष प्रवेश.
कोल्हापूर ( प्रतिनिधी) शिवसेना शिंदे गटाने आज कोल्हापूरातील सर्वच राजकीय पक्षांना धक्का देत अनेकांचा पक्षप्रवेश करून घेतला.या पक्ष प्रवेशाच्या मागं आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह सत्यजीत कदम आणी शारंगधर देशमुख यांनी महत्वाची भूमिका बजावली.उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे,मंञी उदय सामंत,शंभुराज देसाई,पालकमंञी प्रकाश आबिटकर,खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांच्या उपस्थीतीत झालेल्या पक्षप्रवेशांमध्ये अनेक दिग्गजानी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.यावेळी माजी महापौर सरिता मोरे, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे,अजय इंगवले, नेपोलीयन सोनुले, उबाठाचे माजी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस,विवेक महाडिक,रणधीर महाडिक,माजी परिवहन समितीचे सभापती अजित मोरे,माजी नगरसेवक रमेश पोवार, सुभाष मोरे, राजू हुंबे,रत्नेश शिरोळकर, रमेश पुरेकर, मृदुला पुरेकर,प्रविण लिमकर,प्रसाद उगवे, रमेश भोसले, स्मिता माळी,रामचंद्र भाले,रवींद्र साळोखे
यांनी शिवसेनेत प्रवेश केला.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष आर के पवार यांचे पुतणे रमेश पवार यांनी शिवसेनेत प्रवेश करत आर के पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का दिलाय.शिवसेनेच्या या धक्कातंञाने कोल्हापूरचे राजकीय क्षेञ चांगलच ढवळुन निघालय..

Comments
Post a Comment