दिपोत्सवात आला साप...महिलांची उडाली तारांबळ...
कोल्हापूर ( प्रतिनाधी): त्रिपुरारी पौर्णीमेची संध्याकाळ होती!शिवाजीपेठेतील पद्माराजे महीला संघटनेच्या महीला कार्यकर्त्यांनी ऐतिहासीक रंकाळा तलावाच्या काटावर दिपोत्सवाचे आयोजन केले होते.उपस्थीत सर्व महीलांनी उत्साहात रंकाळाच्या काटावर दिप प्रज्वलीत करण्यास सुरवात केली.सर्व महीला पणत्या लावण्यात मग्न होत्या.तर त्यातील एक महीला याचा व्हीडीओ करत होती.पणत्या लावुन झाल्यावर फोटो शेषन चालु झाल..तोवर एक महीला म्हणाली "अग सापासारख काहीतरी दिसतय"...अस म्हणताच एकच गोंधळ उडाला..पहातो तर काय, तलावातील एक विरोळा ज्या ठीकाणी महीला पणत्या लावत होत्या त्याच ठीकाणी पाण्यातुन अचानक बाहेर आल्याने महीलांची अक्षरशा तारांबळ उडाली,साप आल्याच्या भितीने महीलांची चांगलीच भंबेरी उडाली.त्यातच अंधार पडला असल्यामुळे लावलेल्या पंत्यांच्या प्रकाशात लगबगीने आपआपल्या मोबाईलवर सेल्फी घेवुन महीलांनी घरचा रस्ता धरला..जाताना माञ कायमचा दिपोत्सव लक्षात राहीला असे म्हणत महीला हसून लोटपोट झाल्या..

Comments
Post a Comment