उद्योजक महेश उत्तुरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा...
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरातील सामाजीक कार्यकर्त्ये आणी उद्योजक महेश उत्तुरे यांचा वाढदिवस मंगळवार दि.४ नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महेश उत्तुरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते जेवण वाटप, फळे वाटपांसह अनेक सामाजीक उपक्रम राबवण्यात आले.यावेळी मातोश्री वृध्दाश्रम मधील वृध्दांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी वृध्दांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच आर्थिक मदत करण्यात आली. पांजरपोळ येथील गाईंना चारा, गुळ-डाळ देण्यात आली.महेश उत्तुरेंना वाढदिवसानिमीत्य शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती.
यावेळीशिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक विनायक फाळके, प्रताप जाधव, संजय जाधव, संग्राम निंबाळकर, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, सचिन पाटील, प्रवीण केसरकर, विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, प्रमोद पाटील यांच्यासह शहरातील अनेक पक्ष- संघटनांचे पदाधिकारी,तरुण मंडळे,तालीम संस्थेचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, शिवसैनिक,महिला,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment