अण्णाभाऊंच्या विचारांची गरज- सरीता सासने

 कोल्हापूर :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हीच अण्णाभाऊ साठेंना खरी आदरांजली ठरेल असं प्रतिपादन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केलं, ते कोल्हापुरातील टिंबर मार्केट येतील न्यू एकता तरुण मंडळाच्या वतीने लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमीत्य आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना सरिता सासने यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आज समाजाला गरज असल्याचे सांगून पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली, यावेळी पद्माराजे महिला संघटनेच्या कार्यकर्त्या सुषमा सावंत,विजय काळे यांनीही मनोगतं व्यक्त केलीत.यावेळी विद्यार्थांना शालेय साहीत्याचही वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पद्माराजे संघटनेच्या सचिव आरती वाळके, आरपीआयचे करवीर तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, मंगलराव माळगे, दत्ता मिसाळ, यांच्यासह न्यु एकता मंडळाचे करण सकटे, आतिश घोरपडे, प्रदीप साठे, सुनिल तुपे, धोंडीराम तडाखे, विशाल बिरांजे,  विजय तडाखे,यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते.


Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...