राजमाता जिजाऊंची जयंती आदर्शवत उपक्रमाने साजरी...
कोल्हापूर : कोल्हापुरात राजमाता जिजाऊ जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. टिंबर मार्केट येथे राहणाऱ्या व निराधार असणार्या श्रीमती रेखा साळवी या पंच्याहत्तर वर्षाच्या वृध्द महिलेची परिस्थिती अतिशय हालाखीची आहे, त्याचबरोबर त्यांच्या डोळ्याचेही मोतीबिंदुचे ऑपरेशन झाले आहे. यामुळे धुणी भांडी करुन कसाबसा आपला उदरनिर्वाह चालवणार्या श्रीमती रेखा साळवी यांना ऑपरेशन झाल्यामुळे कामावरही जाता आलं नाही. त्यामुळे त्यांना दोन वेळचे जेवण देखील मिळणे मुश्किल झाले होते. ही बाब लक्षात घेऊन पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंतीच्या खर्चाला फाटा देवून श्रीमती साळवी यांना दोन महिन्याचा शिधा देण्यात आला.तसेच जीवनावश्यक वस्तू,साड्या देवुन आर्थिक मदतही करण्यात आली. हा आदर्शवत उपक्रम पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे यांच्या संकल्पनेतून पार पडला. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आरती वाळके,सरीता सासने, शहराध्यक्षा सुषमा सावंत, जिल्हा कार्याध्यक्षा स्मिता हराळे, जिल्हा उपाध्यक्षा शर्मिला भोसले, तृप्ती साळोखे, शशिकला गवळी, उषा महिंद्रेकर, अनिता पाटील, कल्पना मोरे, अलका कोळेकर, लीलाबाई पोवार , छाया पाटील,अनिता मोरे यांच्यासह महीला उपस्थीत होत्या.

Comments
Post a Comment