परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील शिवसेनेत...
कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेनेच्या मुख्यमंञी एकनाथ शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरु झाले असून, परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर आणी जिल्हाप्रमुख सुजीत चव्हाण यांच्या हस्ते भगवा झेंडा आणि भगवा स्कार्फ स्वीकारून संजय पाटील यांच्यासह शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
संजय पाटील यांनी गेल्या बावीस वर्षात जनसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या, शेतकऱ्यांच्या, रेशनच्या प्रश्नांवर शेकडो आंदोलने केली आहेत. भ्रष्टाचारा विरोधात लढाई लढताना त्यांनी आजपर्यंत १३ शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले आहे. तसेच अनेक रेशन धान्य दुकानातील काळा बाझार उघडकीस आणला आहे. ऊस दर आंदोलनात पाटील हे अग्रेसर राहीले आहेत. तर जिल्हा परिषद मधील मुदतबाह्य औषध घोटाळाही उघडकीस आणला आहे, तसेच रेशन वरील गहू घोटाळा उघडकीस आणला त्याचे पडसाद विधानसभेत उमटले होते.संजय पाटील तीन कामगार संघटनांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत.
पक्ष प्रवेशाच्या वेळी बोलताना संजय पाटील यांनी, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांचे सरकार कार्यरत असून, कोल्हापूर जिल्ह्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे. त्यांच्या कार्याची जनसामान्यांमधून प्रशंसा केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत रहाणार असल्याचे सांगीतले. परिवर्तन संघटनेसह इतर चार संघटना या पुढे शिवसेनेशी संलग्न म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक मान्यवर सरसावत आहेत. गेल्या काही दिवसात शहरासह जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असून, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्य विषयक, शैक्षणिक, स्वयंरोजगाराचे उपक्रम हाती घेतल्याचे सांगीतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शाहू मिलचे कामगार नेते अनिल कवाळे, उदय लोखंडे, गजानन हवालदार, सार्थक तोरस्कर, सुनील दावणे, पिंटू जाधव, नारायण कोकरे, संदीप वाडकर, साताप्पा कांबळे, तानाजी मोरे, अनिल जंगटे, अनिल कांबळे, सुशीला आडके, सावित्री सुतार, शेवंता गुरव, जयश्री मादर, मालन पाटील, उत्तम खांडेकर, अण्णाप्पा खेमलट्टी यांच्यासह महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment