विविध उपक्रमांनी केंद्रीय मंञी रामदास आठवले यांचा वाढदिवस साजरा..
कागलमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.
कागल (प्रतिनिधी): रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कागल येथे सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे तसेच कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.वाढदिवसानिमित्त स्व. गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय, स्व. राजे कर्नल दिलीपसिंह घाटगे कर्णबधीर व मुकबधीर विद्यालय येथील विद्यार्थ्यांना आणी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. स्व. राजे कर्नल दिलीपसिंह घाटगे कर्णबधीर व मुकबधीर विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनही आयोजित करण्यात आले होते.यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, चंद्रशेखर कोरे, बी. आर. कांबळे, सात्तापा आणुरकर, विशाल चिखलीकर यांनी मनोगते व्यक्त करत केंद्रीय मंञी रामदास आठवले यांचे सामाजिक न्यायासाठीचे योगदान अधोरेखित केले.कार्यक्रमाला अविनाश शिंदे,संजय लोखंडे, सचिन मोहिते, जयवंत हळदीकर, विशाल चिखलीकर, तानाजी सोनाळकर, दिनेश मळगेकर, किरण सिद्धनेर्लीकर, किसन चौगुले, आनंदा कांबळे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment