हेमंत पाटील यांना प्रभाग क्रमांक आठरामधील नागरीकांचा वाढता पाठींबा...


 कोल्हापूर (सागर चौगले) : गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ समाजकार्य आणि राजकारणामध्ये सक्रिय असणारे हेमंत(बापू) पाटील हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्यानंतर राजकीय परिस्थिती काळानुसार बदलत गेली आणि हेमंत पाटील यांनी २०१४ साली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सध्या हेमंत पाटील यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज व ग्राम विकास विभागाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ते पश्चिम महाराष्ट्र विभागीय सहसंयोजक देखील आहेत.  हेमंत पाटील यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणाबरोबरच समाजकार्याचा देखील वसा जोपासला आहे. कोरोना सारख्या महाभयंकर काळात नागरिकांना केलेली मदत असो कींवा रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीरे आयोजित करून नागरिकांची केलेली सेवा असो हेमंत पाटील निस्वार्थपणे समाज कार्यात अग्रेसर राहीले आहेत.मराठा आरक्षण आणी कोल्हापूरातील टोल विरोधी आंदोलनात हेमंत पाटील कायमच अग्रभागी राहीलेत. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र बॉडी  बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन देखील ते दरवर्षी करत आले आहेत.स्केटींग,क्रिकेट,फुटबाॅल,कुस्ती अशा खेळांना हेमंत पाटील यांनी कायम प्रोत्साहन देण्याच काम केले आहे. हेमंत पाटील हे एक उत्कृष्ट अभिनेता देखील आहेत त्यामुळे कलापुर म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये महापालिकेच्या वतीने नवोदीत कलाकारांसाठी एक अभिनयाचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणींना धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून हेमंत पाटील यांची ओळख आहे. सध्या भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज व ग्राम विकास विभागाचे जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणाऱ्या हेमंत पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच भारतीय महायुतीसाठी ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. प्रभाग क्रमांक 18 मधून ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवू इच्छितात.   प्रभाग क्रमांक 18 हा सायबर चौक ते हॉकी स्टेडियम रामानंदनगरचा काही भाग, राजेंद्र नगर अशा मोठ्या परिसरात व्यापला गेला आहे. या प्रभागामध्ये 27 हजार हून अधिक मतदार आहेत.हा प्रभाग भौगोलिक दृष्ट्या मोठा असून या 2020 पासून प्रशासक आल्यापासून प्रभागाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याची सर्वसामान्य नागरीकांची प्रतिक्रीया आहे. त्यामुळे या प्रभागात नागरी सुविधांच्या समस्या उद्भवल्या आहेत. नागरिकांना रस्ते, लाईट, गटर्स, पाणी या नागरी सुविधा तर पुरवणारच शिवाय जर नागरिकांनी संधी दिली तर  प्रभागामध्ये सुसज्ज हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचा मानस हेमंत पाटील यांनी व्यक्त केला  आहे. तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मीळावे यासाठी प्रभागांमध्येच व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारून बेरोजगारी हटवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा त्यांचा निर्धार आहे.हेमंत पाटील यांचं गेल्या 25 वर्षाहून अधिक सामाजिक कार्य पाहता प्रभागातील जनता त्यांना नगरसेवक म्हणून महापालिकेत आपलं प्रतिनिधित्व करायची नक्कीच संधी देईल असा विश्वास प्रभागातील अनेक जेष्ठ नागरीक,तरुण व्यक्त करत आहेत.हेमंत पाटील यांनी आपला प्रचार सुरु केल्यापासुन प्रभागातील नागरीकांचा त्यांना मोठा प्रतिसाद मीळत आहे.


कोल्हापूर ब्रेकिंग संपर्क क्रमांक-9326499921/8483899521

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...