अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आंदोलन...

कोल्हापूर :
कोल्हापूर शहरामध्ये काही ट्रॅफिक पोलिसांची दादागिरी वाढत आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे.  अनेक ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड नसतात त्या ठिकाणी गाडी पार्क केल्यास ट्राफिक पोलीस आरेरावी करून वाहनधारकांच्या गाड्या उचलत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वनवे असल्याचं बोर्डच लावलेलेच नाहीत. कींवा लावलेले बोर्ड गायब झाले आहेत, त्यामुळे अनेक नागरिकांच्या वनवे असल्याचं लक्षात येत नाही. त्यामुळे अजाणतेमुळे वनवेतुन गेल्यावर वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर शहरांमध्ये येणाऱ्या बाहेरील पर्यटकांच्या गाड्या आडवुन काही ट्रॅफिक पोलीस दादागिरी करत आहेत. असे सर्रास प्रकार पाहावयास मिळत असल्यामुळे कोल्हापूरचे नाव आता बाहेरील पर्यटकात खराब होत आहे.तर अनेकदा वादाच्या प्रसंगावेळी संबंधीत महीलांचे मोबाईलवर चिञीकरण करण्याचा अधिकार ट्रफीक पोलीसांना कोणी दिला. त्यामुळे अशा ट्रॅफिक पोलिसांना आपण योग्य ती समझ व सूचना द्याव्यात. तसंच काही ट्रॅफिक पोलीसच वनवेतून गाड्या घालतात, तर काहीजण नो पार्किंग मध्ये गाड्या लावतात.  अनेकवेळा ट्रफीक पोलीसच गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलताना दिसतात.मग अशा पोलीसांवर कोण कारवाही करणार? असा प्रश्न उपस्थीत होतो.कारण  कायदा सर्वांना समान आहे. या निवेदनाव्दारे आम्ही काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणुन देत आहोत त्या पुढील प्रमाणे-  शहरातील अनेक ठिकाणचे सिग्नल बंद आहेत.त्यामुळे ठीकठीकाणी वहातुकीची कोंडी होत असते. अनेक ठिकाणी रस्ता दुभाजकांना रिफ्लेक्टर नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. बंद असलेले सिग्नल लवकरात लवकर सुरू करावेत. रस्ता दुभाजकांना रिप्लेटर बसावेत.ज्या ठीकाणी नो पार्कींग आहे त्या ठीकाणी बोर्ड लावावेत,वनवे आहेत त्या ठीकाणी सुचना फलक लावावेत,यातील काही गोष्टी महापालीकेच्या अधिकारात येत असतील तर प्रशासकीय स्तरावर योग्यती कारवाई करुन वरील सर्व बाबींची पुर्तता करावी. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी लाक्षणिक आंदोलन केले जाईल.
अशा आशयाचे निवेदन पद्माराजे महीला संघटनेच्या वतीने शहर वहातुक नियंञण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांना देण्यात आले.यावेळी पद्माराजे महीला संघटनेच्या अध्यक्षा सरीता सासने,आरती वाळके,बरखा पाटील,शर्मीला भोसले,अनिता पाटील,छाया पाटील,कल्पना मोरे,मंगल देसाई,लीलाबाई पोवार,साधना परब,उषा महींद्रकर, उपस्थीत होत्या.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...