कोल्हापूरात घेण्यात आली शपथ...

 

कोल्हापुरात काही दिवसापूर्वी जातीय दंगल झाली होती. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सुप्रसिद्ध वकील आणि जिल्हा ग्राहक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रताप जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंबेवाडी येथील विद्या संस्कार सेमी इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी सर्वधर्मसमभाव आणि  राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, मौलाना अब्दुल कलाम आझाद, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, महाराणी ताराराणी, वल्लभभाई पटेल अशा थोर समाजसुधारकांची वेशभूषा केली होती. अॅड. प्रताप जाधव हे आपल्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात.  त्याचाच भाग म्हणून आज विद्यार्थ्यांनी एकात्मतेची शपथ घेतली.तर एडवोकेट प्रताप जाधव यांच्या वाढदिवसानिमीत्य  मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या परीसरात वृक्षारोपण,कसबा बावडा येथील मतिमंद मुलांची शाळा येथे अल्पोउपहार व धान्य वाटप, अवनी  संस्था येथे शैक्षणिक साहित्य वाटप, संभाजीनगर येथील कामगार चाळीतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे आरोग्यवर्धक औषधांचा वाटप, भाऊसो महागावकर विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप केलं .या कार्यक्रमाला सिव्हिल जज सीनियर डिव्हिजन तथा सदस्य विधीसेवा विभाजाचे पी एम पाटील, विद्यासंस्कार सेमी इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल ज्योति सुपेकर, सहाय्यक शिक्षक केदार दळवी, सहाय्यक शिक्षिका प्रतीक्षा आंबेकर, अॅड. उमेश माणगावे, ऋतुजा जाधव, फिरोज शेख, सुशील हंजे, दिग्विजय जाधव, सुजित जाधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...