"त्या" दिलेल्या परवानग्या रद्द करा...कळंबा वाचवा...
"त्या" परवानग्या रद्द करा,कळंबा तलाव वाचवा...
(कोल्हापूर ब्रेकींग स्पेशल रपोर्ट )
कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. अशी परिस्थिती असताना देखील कळंबा,पाचगावसह कोल्हापूरातील काही भागांना पाणी पुरवठा करणारा कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने अजुनही भरलेला नाही. कारण गेल्या दिवसांमध्ये कळंबा तलाव पाणलोट क्षेञात अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामे झाली आहेत .काही महाभागांनी प्लॉटींग करताना कळंबा तलावाला मिळणारे जलस्तोत्रांचे मार्ग बदलले आहेत, तर कळंबा तलावाला ज्या ओढ्या नाल्यातून पाणी येते त्या नैसर्गीक ओढ्या नाल्यांची पात्रच प्लॉटींगच्या नादात अरुंद किंवा बुजवण्याचे काम या महाभागांनी केले आहे. यामुळे कळंबा तलावातील जलस्तोत्र कमी झाले आहेत. यामुळे कळंबा तलाव निम्मा पावसाळा झालातरी अजूनही भरलेला नाही.या परस्थीतीला जबाबदार घटकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी कळंब्यातील नागरिकातून होत आहे. तसेच प्लॉटींग केल्यानंतर जलस्तोत्र नाहीशी झाली आहेत तर त्याच ठिकाणी बांधकाम झाल्यानंतर काय परिस्थिती होईल याचा विचार ही प्रशासनाने करावा व कळंबा पाणलोट क्षेत्रात बांधकामास परवानगी देऊ नये अशी मागणी कळंबा तलाव प्रेमीतून होत आहे. तसेच प्रशासकीय स्तरावर प्राधिकरणाने यापुर्वी दिलेल्या बांधकाम परवान्या रद्द कराव्यात आणी ऐतिहासीक कळंबा तलाव वाचवावा अशी मागणी विविध पक्ष आणि संघटनांकडून होत आहे.
क्रमशः

Comments
Post a Comment