अनेक सामाजीक प्रश्नांवर आंदोलन करणारा आक्रमक आंदोलक-अमर जत्राटे
कोल्हापूर ब्रेकिंग(मुख्य प्रतिनिधी-सागर चौगले)
कोल्हापूर : तीस वर्षांपूर्वी जर कोणी विचार केला असता तर कोल्हापूरच्या राजकारणामध्ये भाजप नंबर एक पक्ष होईल अस कुणालाही वाटल नसते. कारण त्यावेळी भाजपची ताकद अतिशय नगण्य अशी होती. त्यावेळी भाजपकडे मोजकेच पण कट्टर कार्यकर्ते होते. अशाच कट्टर कार्यकर्त्यांपैकी करवीर तालुक्यातील बालींगा गावातील एक नाव म्हणजे अमर मारुती जत्राटे होय... अमर जत्राटे यांनी आपल्या शालेय जीवनापासूनच भाजपच्या विचारसरणीवर आपली वाटचाल सुरू केली. त्यांनी बालिंगा गावचे उपसरपंचपद ही भूषवलं.. अन्याय अत्याचाराच्या विरोधात कायम रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता अशी अमर जत्राटे यांची संपूर्ण तालुक्याला ओळख होती. वीज दरवाढ, शेतकऱ्यांची कर्जमाफीचा प्रश्न, बालिंगा पुलाचे प्रश्न, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा प्रश्न असोत कींवा रस्ते ,लाईट पाणी यासारख्या समस्या सोडवण्यासाठी केलेली आंदोलने असोत एवढेच न्हवे तर मराठा आरक्षण आंदोलनातही त्यांनी लक्षवेधक भुमीका बजावली.कोल्हापूरच्या टोलविरोधी आंदोलनात सहभाग घेवुन फुलेवाडी टोल नाका फोडण्यात व वीज दरवाढी विरोधात विद्युत मंडळाच्या कार्यालयावर चप्पल फेक आंदोलनात ते अग्रभागी राहीले.अनेक आंदोलनात त्यांच्यावर पोलीस केसेस देखील झाल्या.माञ अमर जत्राटे यांनी आपला अन्यायाविरोधातला लढा सुरुच ठेवला. यामुळे करवीर तालुक्यातील भाजपचा एक आक्रमक आंदोलक म्हणून अमर जत्राटे यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली. रस्त्यावरील लढाई लढत असतानाच अमर जत्राटे यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यात देखील आपला वेगळा ठसा उमटवला. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातुन अनेक गरजु रुग्णांच्यावर विविध शस्त्रक्रीया मोफत केल्याच शिवाय कोरोना काळात अनेक रुग्णांचे प्राण वाचवले,गोरगरीब रुग्णांसाठी ॲम्बुलन्स सेवा,कात्यायणी मंदिर देवस्थानच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून देवीच्या विविध धार्मिक कार्यक्रमातील सहभाग,महाप्रसादाचे नियोजनात त्यांची भुमीका महत्वाची राहीली तसेच प्रदूषणास आळा बसावा यासाठी गणेश विसर्जनाच्यावेळी निर्माल्याबरोबरच गणेश मूर्तीदाना उपक्रम देखील त्यांनी प्रभावीपणे राबवला. परिसरातील कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राला देखील प्रोत्साहन मिळावं यासाठी अमर जत्राटे कायमच प्रयत्नशील राहिलेत. म्हणूनच समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या अमर जत्राटे यांच्या समाजकार्याची पोचपावती देण्याची वेळ आली आहे... होय...अमर जत्राटे हे शिंगणापूर पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या कमळ या चिन्हावर उभे राहिले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट,आरपीआय,जनसुराज्य पक्ष आणि भाजप युतीचे ते उमेदवार असून अमर जत्राटे यांच्यासारख्या सच्चा प्रामाणिक कार्यकर्त्याला पंचायत समितीचे सदस्य बनवून त्यांना जनसेवेची संधी देऊया.. अमर जत्राटे यांना निवडून आणूया... धन्यवाद...

Comments
Post a Comment