शेतकर्याची लेक म्हणून निवडूण द्या-विनिता भोगम..
कळंबा(प्रतिनिधी): जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शेतकरी वर्ग मात्र शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे.यामुळे कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार विनिता भोगम या चक्क शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर जाऊन आपला प्रचार करत आहेत. विनिता भोगम ह्या सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकरी वर्गाशी त्यांची पुर्वीपासुनच नाळ जुळली आहे.यामुळे शेतकरी वर्गातून विनिता भोगम यांना उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्याची लेक म्हणून जिल्हा परिषद सदस्या म्हणून एकदा संधी द्या..मी नक्कीच शेतकरी वर्गासाठी विकासात्मक धोरणे राबविन असा आपुलकीचा प्रचार विनिता भोगम करत असल्यामुळे शेतकरी वर्गातून देखील त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.


Comments
Post a Comment