कोल्हापूरात केली जात आहे पारंपारीक खेळांची जोपासना..


 कोल्हापूर (प्रतिनिधी): सध्याच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये लहान मुलं,मुली, महिला, युवा पिढी ही मोबाईल मध्ये गुंग असते. यामुळे जे पारंपारिक खेळ आहेत ते लोप पावत चालले आहेत ही गोष्ट लक्षात घेऊन कोल्हापूरातील शिवाजीपेठ येथील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लहान मुली, महिला,अबाल वृद्धांसाठी पारंपारिक खेळाचं दरवर्षी आयोजन करण्यात येते.यामध्ये काचा कवड्या , बिट्या , जिबलि , लगोरी , दोरी उड्या, रस्सीखेच , आंधळी कोशिंबीर, तळ्यात मळ्यात, आईच पत्र हरवलं अशा अनेक पारंपरिक खेळांचा समावेश असतो. या खेळामध्ये दहा वर्षाच्या मुली पासून ते ८० वर्षाच्या आजीबाई पर्यंतच्या सर्व महिला मोठ्या आनंदाने सहभागी झाल्या  आणि मनमुराद आनंद लुटला.या यावेळी बोलताना पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांनी लोप पावत चाललेले पारंपारिक खेळ  जोपासले जावेत, नवीन पिढीला अवगत व्हावेत या मागचा उद्देश आहे अस सांगीतले. यावेळी परिसरातील  सहभागी झालेल्या महिलांनी समाधान व्यक्त करत पद्माराजे महीला संघटनेचे आभार मानले. या उपक्रमामध्ये संघटनेच्या पदाधिकारी, सदस्या, यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...