विनिता सागर भोगम यांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये उत्साह..
कळंबा (प्रतिनिधी): कळंबा गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच सागर भोगम आणि त्यांच्या पत्नी विनिता भोगम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपच्या कार्यकर्त्यांना दहा हत्तीचे बळ आले आहे. सागर भोगम यांची काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ओळख होती, मात्र महायुती सरकारचे विकासाभिमुख कार्य पाहून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भोगम दांपत्याने खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थीतीत प्रवेश केला.सागर भोगम आणी विनिता भोगम यांच्या भाजपप्रवेशाचे कळंबा जिल्हा परिषद मतदार संघात स्वागत होत आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्याने विनिता भोगम यांची भाजपकडून कळंबा जिल्हा परिषद मतदार संघात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे वनिता भोगम यांच्या रूपाने विरोधकांसमोर एक तगडे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सागर भोगम आणी विनिता भोगम यांनी आपला प्रचार सुरू केला असून वैयक्तिक गाठीभेटींच्यावर त्यांनी भर दिला आहे.

Comments
Post a Comment