पाचगावमध्ये संग्राम पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ...
पाचगाव (प्रतिनिधी): पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांचा पाचगाव येथील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.पाचगावचे ग्राम दैवत श्री भैरवनाथ मंदीरात माजी आमदार ऋतुराज पाटील आणी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच पदाच्या कार्यकाळात संग्राम पाटील आणि त्यांच्या पत्नी प्रियंका पाटील यांनी पाचगाव मध्ये केलेल्या विकास कामाची पोचपावती म्हणून संग्राम पाटील यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून मतदार निवडून देतील असा विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाने, दिलीप जाधव, नारायण गाडगीळ यांच्यासह महीला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment