विनिता भोगम यांनाच निवडुण देण्याचा नागरीकांनी केला निर्धार...
कळंबा (प्रतिनिधी): कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार विनिता सागर भोगम यांचा मतदारसंघांमध्ये झंजावती प्रचार दौरा सुरू आहे. त्यांच्या प्रचारामध्ये युवकांच्या बरोबरच महिला देखील मोठ्या संख्येने सामील होत आहेत. विनिता भोगम या प्रचारादरम्यान मतदारसंघात येणाऱ्या गावातील समस्या जाणून घेत आहेत. तसेच मतदारांनी संधी दिल्यास त्या समस्या सोडवण्याचे अभिवचन मतदारांना देत आहेत. कळंबा मतदार संघाच्या विकासाच्या मुद्यावरच विनिता भोगम यांनी भर दिल्यामुळे त्यांना दिवसेंदिवस पाठींबा वाढत आहे.तसेच सागर भोगम यांनी केलेल्या केलेले सरपंचपदाच्या काळातील विकास कामे कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वच गावांमध्ये सुपरिचित असल्यामुळे कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील नागरीकांनी महायुती कडून भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणुक लढवत असलेल्या विनिता भोगम यांनाच प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार केल्याचे चिञ कळंबा मतदार संघात दिसुन येत आहे.


Comments
Post a Comment