मतदार जनजागृतीसाठी कोल्हापूरात थाळीनाद...


 कोल्हापूर (प्रतिनिधी): सध्या कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे.या निवडणुकीमध्ये  नागरिकांना खोटी आश्वासन देऊन, आमिषे दाखवून चुकीच्या प्रवृत्ती निवडून येण्याची शक्यता आहे .त्यामुळे मतदारांनी व नागरिकांनी जागरूक होऊन शहराचा विकास करणाऱ्या व्यक्तीला तसेच योग्य उमेदवाराला निवडून द्यावे यासाठी कोल्हापूरातील शिवाजीपेठ येथील पद्माराजे महिला  संघटनेच्या वतीने जनजागृतीसाठी आगळावेगळा  उपक्रम घेण्यात आला. ज्याप्रमाणे कोरोना व्हायरस पासून नागरीकांमध्ये जागृती करण्यासाठी सरकारने थाळी नाद केला होता त्याचप्रमाणे निवडणुकीत दाखवल्या जाणारी आमिषे म्हणजे एक प्रकारचा व्हायरसच आहे. त्यापासून लोकांनी सावध राहावं. यासाठी जनजागृती करण्यासाठी पद्माराजे महीला संघटनेच्यावतीने थाळीनाद करुन नागरीकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.शिवाजीपेठ येथील उभा मारुती चौक आणी अर्धा शिवाजी महाराज पुतळा  अशा दोन ठिकाणी संघटनेच्या महीलांनी  थाळीनाद  करून नागरीकांचे लक्ष वेधले.यावेळी 'दारुची बाटली,मटणाची नळी...पडू नका अमीषांना बळी' तसेच हजाराचे पाकीट घेवुन बसा,पुढची पाच वर्षे बोंबलत बसा..मतदारराजा जागा हो,विकासाचा धागा हो...अशा घोषणा देत महिलांनी थाळीनाद केला.यावेळी संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांनी नागरीकांनी निवडणुकीत दाखवल्या जाणार्‍या अमीषांना बळी न पडता योग्य उमेदवार निवडुण देवून शहराच्या विकासाला चालना द्यावी असे अहवान केले.यावेळी हेमलता देसाई,आरती वाळके,सरिता सासणे,गीता भोसले,शर्मिला भोसले, अनिता पाटील, सुजाता भोसले, उषा महिंद्रकर, अलका कोळेकर, शशिकला गवळी, मालती पाटील, मंगल देसाई , माधुरी तांबट, शालिनी चव्हाण, अनिता पाटील, लता शिखरे, बबीता जाधव,  लता माने यांच्यासह महीला मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...