विनिता भोगम यांच्या प्रचारात महायुतीचे सर्व कार्यकर्त्ये सक्रीय..
कळंबा (प्रतिनिधी): कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार विनिता सागर भोगम यांना कळंबा गावात मोठा प्रतिसाद मिळत आहे. कळंबा गावातील महायुतीचे सर्व कार्यकर्त्ये विनिता भोगम यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.कळंबा गावातील महायुतीचे प्रमुख नेते कार्यकर्ते दररोज संध्याकाळी गावामध्ये प्रचार फेरी काढत आहेत. तसेच विनिता भोगम यांची निवडणूक लढवण्यामागची विकासात्मक भूमिका स्पष्ट करणारी माहीती पत्रके देखील घरोघरी देत आहेत. कळंबा गावचे पहिले लोकनियुक्त सरपंचपद सागर भोगम यांनी भूषवले होते. या कार्यकाळात सागर भोगम यांनी अनेक विकास कामे केली आहेत. याचा फायदा विनिता भोगम यांना नक्कीच होणार आहे.कळंबा गावातील मतदार विनिता भोगम यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलतील असा विश्वास महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे.

Comments
Post a Comment