पद्माराजे महीला संघटनेच्यावतीने जिजाऊ जयंती उत्साहात साजरी...


 कोल्हापूर(प्रतिनिधी): कोल्हापूरातील शिवाजी पेठ येथील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे,सचिव आरती वाळके यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेच पूजन करण्यात आलं. यानंतर राजमाता जिजाऊ जयंती निमित्त पद्माराजे महिला संघटनेच्या कार्याध्यक्षा स्मिता हराळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना सरीता सासने यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आलं. यावेळी संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या गीता भोसले आणि अनिता पाटील यांनी राजमाता जिजाऊंच्या कार्याचा आढावा घेतला.कार्यक्रमाला आरती वाळके,संस्कृती  वरुटे, आशा पाटील, मेघा साळोखे, केतकी करंदीकर, पद्मा तुपारें  यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थिती होत्या.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...