पाचगाव जिल्हा परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी संग्राम पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही...
पाचगाव ( प्रतिनिधी): पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम गोपाळ पाटील आणि उजळाईवाडी पंचायत समितीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शिल्पा संदीप हजारे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उजळाईवाडी येथील आसोबा मंदिरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना अनेक मान्यवरांनी संग्राम पाटील यांनी पाचगावचे लोकनियुक्त सरपंचपद भूषवलेल आहे.त्यांना प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असुन सरपंचपदाच्या काळात त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरच पाचगावच्या जनतेने पुन्हा संग्राम पाटील यांच्या पत्नी प्रियंका पाटील यांना सरपंच म्हणून निवडून दिले आहे.म्हणूनच पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर संग्राम पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले. यावेळी संग्राम पाटील यांनी पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघातील जनतेने निवडुन दिल्यास, विकासाभिमुख काम करून मी जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविन असे अभिवचन दिल.यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.

Comments
Post a Comment