सौ.विनिता सागर भोगम यश मीळवणारच..भाजपा कार्यकर्त्यांना विश्वास..


 कळंबा (प्रतिनिधी): कळंबा गावचे पहीले लोकनियुक्त सरपंच सागर भोगम यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्य काळामध्ये केलेल्या अनेक  विकासकामांचा फायदा जिल्हा परिषद निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ.विनिता सागर भोगम यांना होणार आहे. कारण,सागर भोगम यांनी सरपंच असताना अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले होते. तसेच महिला बचत गटांना सक्षम बनवण्यासाठी अनेक रोजगार प्रशिक्षणे आयोजित केली होती. बचत गटांना चालना देण्यासाठी खाद्य महोत्सवही भरवले होते. तर कला, क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात देखील मोलाचे योगदान दिले. क्रीडा क्षेत्राला उर्जित अवस्था आणण्यासाठी सागर भोगम यांनी अनेक स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.क्रिकेट,कुस्ती,बैलगाडी,बकर्‍याच्या टकरी अशा स्पर्धांना स्वखर्चातुन भरघोस बक्षीसे देवून क्रिडा क्षेञाला उर्जीत अवस्था आणली. तसेच गावातील रस्त्ये, लाईट, गटर्स अशा अनेक नागरी समस्या सोडवण्यात ते यशस्वी झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कळंबा ग्रामस्थांसाठी स्वप्नवत असणारी ग्रामपंचायतीची स्वतःची इमारत नव्हती. यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून सागर भोगम यांनी  कोट्यावधी रुपयांचा निधी खेचुन आणत  कळंबा ग्रामपंचायतची स्वतःची इमारत साकारत  कळंबा ग्रामस्थांची स्वप्नपुर्ती केली आणी कळंबा गावच्या ग्रामस्थांनी पहीला लोकनियुक्त सरपंच म्हणून केलेली निवड खर्‍या अर्थाने सार्थकी ठरवली. कळंबा गावाबरोबरच कोल्हापूर दक्षिण मधील सर्वच गावामध्ये  सागर भोगम यांचा मोठा जनसंपर्क आहे. सागर भोगम यांनी निस्वार्थपणे केलेल्या विकास कामाच्या जोरावरच त्यांच्या पत्नी सौ. विनिता सागर भोगम ह्या कळंबा जिल्हा परिषद निवडणुकीत नक्कीच यश मीळवतील असा भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...