आजच्या साविञींचा कोल्हापूरात सन्मान...
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरातील शिवाजीपेठ येथील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने यावर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. पद्माराजे महिला संघटनेच्या सामाजिक कार्यात सहभाग घेवुन आपले घर संसार सांभाळून सक्षमपणे आपल्या पायावर उभ्या असलेल्या संघटनेच्याच सहा सदस्यांचा मेजर रुपा शहा यांच्या हस्ते 'आजची सावित्री' हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आरती वाळके,सुषमा सावंत,संस्कृती वरुटे,शालीनी चव्हाण,ज्योती काशीद,स्मीता हराळे यांना पुरस्कार देवून गौरवण्यात आले.यावेळी बोलताना पद्माराजे महीला संघटनेच्या अध्यक्षा सरीता सासने यांनी संघटनेतील महीलांना सामाजीक कार्यात आणखीन प्रोत्साहन मीळावे व इतर महीलांनी या पुरस्कार विजेत्या महीलांपासुन प्रेरणा घ्यावी म्हणूनच हा उपक्रम राबवल्याचे सांगीतले. तर मेजर रुपा शहा यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आज समाजाला गरज असल्याचे सांगीतले.यावेळी हेमललता देसाई,आरती वाळके,सुषमा सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन जेष्ठ महीलांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला संघटनेच्या बबिता जाधव, गीता भोसले,शकुंतला सरनाईक, लक्ष्मी येरुडकर, यांच्यासह कार्यकर्त्या,महीला मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.

Comments
Post a Comment