कळंबा पचायत समीती मतदार संघात चर्चेचा विषय...
कळंबा (प्रतिनिधी): भावा आपल्या हक्काच्याच माणसाला मतदान करायचं..म्हणजेच पंकज गुरवलाच मतदान करायच असं सांगत कळंबा पंचायत समीतीसाठी कळंबा गावातील तरुणांनी एकञ येत पंकज पांडुरंग गुरव या सामाजीक कार्यकर्त्याला निवडणुकीच्या रींगणात उतरवले आहे. पंकजच्या मित्र परिवाराने एकत्र येत वर्गणी काढून त्याला कळंबा पंचायत समितीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. जग या चिन्हावर पंकज गुरव निवडणूक लढवत आहे. आज त्याच्या प्रचाराचा शुभारंभ कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी महिलांची संख्याही लक्षणीय होती. यामुळे पंकज गुरवची उमेदवारी हा एक कळंबा पंचायत समिती मतदार संघात चर्चेचा विषय बनली आहे.

Comments
Post a Comment