विनिता भोगम यांच्या प्रचारात कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक...
कळंबा (प्रतिनिधी): कळंबा जिल्हा परिषद मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार विनिता सागर भोगम यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आला. यावेळी कळंबा गावासह कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थित होती. तर सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे कळंबा गावाला संलग्न असणाऱ्या कोल्हापूर शहराच्या उपनगरातील चार नगरसेवकांची विनिता भोगम यांच्या प्रचारासाठीची उपस्थिती..कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मंदीराच्या प्रांगणात असंख्य कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या.विनिता भोगम यांनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे प्रथम दर्शन घेतले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यानंतर कळंबा गावात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी नगरसेवक अभिजीत खतकर, विजयसिंह खाडे,वैभव कुंभार,अभय तेंडुलकर,विलासराव बेडगे,रंगराव तोरस्कर या मान्यवरांनी प्रचाराला जमलेला जनसमुदाय विनिता भोगम यांचा विजय निश्चीत असल्याचे सांगुन जातोय अशी प्रतिक्रीया व्यक्त केली. यावेळी कळंबा गावासह कळंबा मतदार संघातील महायुतीचे नेते,कार्यकर्त्ये,महीला यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते.

Comments
Post a Comment