कळंबा जिल्हा परिषद मतदार संघात विनिता भोगम यांना वाढता पाठींबा..
कळंबा (प्रतिनिधी): महायुतीच्या उमेदवार विनिता भोगम यांना कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील निवडणूकीमध्ये सर्वच गावातून पाठिंबा वाढत आहे.कळंबा जिल्हा परिषद मतदार संघात येणाऱ्या कळंबा गावासह कंदलगाव, गिरगाव, कोगील खुर्द ,कोगील बुद्रुक, हणबरवाडी, दिंडनेर्ली, दर्याचे वडगाव,नंदगाव, खेबवडे, नागाव या सर्व गावातील महायुतीचे नेते, कार्यकर्ते विनिता भोगम यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. यामुळे विनिता भोगम यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे.विनिता भोगम यांचे पती सागर भोगम यांनी कळंबा ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषवले आहे.सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेली विकास कामांची पोचपावती म्हणून विनिता भोगम यांना महायुतीकडून भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कळंबा जिल्हा परिषद मतदार संघाचा सर्वांगीण विकासासाठी विनिता भोगम यांनाच निवडून द्या अशा विकासात्मक मुद्द्यावर प्रचारात भर देण्यात आला आहे.

Comments
Post a Comment