नागरिकांचा संताप! बापूरामनगर मेन रोडची दुरवस्था, सांडपाणी घरात; नागरिकांची तीव्र मागणी – "रस्ता त्वरित करा, अन्यथा आंदोलन अटळ!"
रविवार, दिनांक २२/०६/२०२५ रोजी प्रभाग क्र. ७९, सुर्वेनगर येथील बापूरामनगर मेन रोडवरील खड्ड्यांमुळे संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेला जाब विचारला.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे कोणतेही काम न झाल्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मागील वर्षी पावसाळ्यात श्री शिवराज पाटील (दादा) सोशल फाउंडेशन यांनी स्वखर्चातून खड्डे मोजले होते. मात्र, महानगरपालिकेने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
यामुळे सांडपाणी घरात घुसत असून डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढत आहे. नागरिकांनी रस्ता त्वरित दुरुस्त करावा व गटारी स्वच्छ करून पाण्याचा निचरा करावा, अन्यथा आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
उपस्थित: श्री विजयकुमार कांबळे, श्री योगेश पाटील, पंकज वाघमारे, सागर फुटाणे, प्रमोद पाटील, मालेकर सर, बाबुराव जाधव, आदित्य गुरव, जयसिंग वडगावकर, सुधीन बनगे आणि परिसरातील नागरिक.




Comments
Post a Comment