'संवाद प्रतिवाद'चे अनावरण उत्साहात संपन्न..
'संवाद प्रतिवाद'चे अनावरण सोहळा उत्साहात संपन्न..
कळंबा (प्रतिनाधी): करवीर तालुक्यातील कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई यात्रेनिमित्त संवाद प्रतिवाद या वृत्तपत्राने विशेष अंक प्रसिद्ध केला आहे. या विशेष अंकाचे अनावरण माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे नेते सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेवक स्वरूप कदम, विजेंद्रसिंह माने, राजू पागर ,वैभव माने ,प्रमोद देसाई, अभिषेक जाधव, महेश महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, कळंब्याचे माजी सरपंच सागर भोगम, गव्हर्मेंट सर्व्हंट बँकेचे संचालक शशिकांत तीवले, कळंबा ग्रामपंचायतची सदस्य दीपक तिवले,सामाजिक कार्यकर्ते बाजीराव पोवार, उत्तम जाधव, प्रकाश कदम, राज युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अरुण पाटील टोपकर, भारत पाटील यांनी केले. यावेळी बोलताना संवाद प्रतिवादचे कार्यकारी संपादक सागर चौगले यांनी या विशेष अंकामध्ये कळंबा गावच्या यात्रेचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे महात्म्य सांगण्यात आले आहे असे नमूद केले .तर यावेळी सत्यजित उर्फ नाना कदम आणि उपस्थित सर्व नगरसेवकांनी संवाद प्रतिवादच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कळंबा गावचे उपसरपंच रोहीत जगताप,ग्राम पंचायत सदस्य विकास पोवार, संदीप पाटील,भगवान पाटील,सुरेश नाईक,संग्राम जाधव,रमेश मगदुम,प्रकाश कदम,तानाजी पाटील,विश्वास खानवीलकर,दत्ता हळदे,विजय खानविलकर,विश्वास गुरव,भगवान तिवले यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments
Post a Comment