मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरातुन एल्गार...
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरातुन एल्गार...
कोल्हापूर (प्रतिनिधी): मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.या आंदोलनाला कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. आज सकल मराठा बांधवांच्या उपस्थितीत त्यांनी हा पाठिंबा दर्शवला.यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आग्रही भुमीका मांडली.तर मराठा योध्दे बाबा इंदुलकर यांनी मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना ई मेल व्दारे पाटवल्याची माहीती दिली.याप्रसंगी मराठा बांधवांनी घोषणा देत परीसर दणाणुन सोडला. कोल्हापूरातील दसरा चौकात झालेल्या पत्रकार परीषदेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे, राष्ट्रीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष सागर चौगले, मराठा योध्दे दिलीप देसाई,बाबा पार्टे, गणी आजरेकर ,अनिल घाटगे,राज बडकस,काका पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.


Comments
Post a Comment