साईराज जाधवची कळंब्यात जल्लोषी मीरवणुक...
साईराज जाधवची कळंबा गावात जल्लोषी मिरवणुक..
कळंबा (प्रतिनिधी): पुणे जिल्हा पोलीस दलामध्ये करवीर तालुक्यातील कळंबा येथील साईराज युवराज जाधव याची निवड झाल्याबद्दल कळंब्यातील नागरिकांनी त्याची जल्लोषी मिरवणूक काढली. यावेळी अनेक मान्यवरांनी साईराज जाधव याला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी कळंबा गावच्या सरपंच सुमन गुरव, माजी सरपंच सागर भोगम, उत्तम जाधव, अरुण टोपकर, बाजीराव पोवार, उमेश भवड, सुरेश नाईक, प्रकाश कदम, संजय जाधव यांची प्रमुख उपस्थीती होती.तर मीरवणुकीमध्ये उपसरपंच रोहीत जगताप, दीपक तिवले, छाया भवड, भाग्यश्री पाटोळे, रोहित मिरजे,पुनम जाधव, संदीप पाटील, स्नेहल जाधव,विकास पोवार, मीना गौड, नितीश शिंदे, स्वरूप पाटील, दिपाली रोपळकर,वैशाली टिपुगडे, उदय जाधव, आशा टिपुगडे ,संगीता माने ,ग्रामसेवक विलास राबाडे गावातील विविध तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Comments
Post a Comment