वि कृ वरुटे यांचे निधन..


 *विद्यापीठ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक  वि. कृ. वरुटे  यांचे दु:खद निधन*


दिनांक:- ७ मे, २०२६

कोल्हापूर ( प्रतिनिधी): विद्यापीठ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, भूगोल विषयाचे नामांकित शिक्षक वि. कृ. वरुटे यांचे  दु:खद निधन झाले.ते ७८ वर्षांचे होते. भूगोल हा जरी त्यांचा अध्यापनाचा मुख्य विषय असला तरी शारीरिक शिक्षणाची पदविका त्यांनी घेतली असल्याने शारीरिक शिक्षण आणि जिमखान्याच्या सर्व उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा. वारकरी संप्रदायाचे वरुटे घराण्याचे संस्कार  त्यांनी आयुष्यभर जपले  होते. कोल्हापुरातील ' पश्यंती ' या अध्यात्मिक केंद्रात ते क्रियाशील होते. अतिशय नम्र, संवेदनशील, संयमी आणि सकारात्मक दृष्टिकोन हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. विद्यार्थी प्रिय शिक्षक असा त्यांचा नावलौकिक होता. विद्यापीठ हायस्कूल मधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त  झाल्यावर त्यांनी अध्यात्मिक वाचन, चिंतन-मनन आणि लेखन यात स्वत: ला गुंतवून घेतले होते. विद्यापीठ हायस्कूलचे सर्व आजी- माजी शिक्षक , विद्यार्थी यांनी  वरुटे यांच्या निधनांतर शोक व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...