कोल्हापूर ब्रेकिंग चॅनेलवरील "आमचा कळंबा" या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद,
कोल्हापूर ब्रेकिंग चॅनेलवरील 'आमचा कळंबा' या विशेष कार्यक्रमास कळंबा गावच्या नागरीकांचा उदंड प्रतिसाद.
कोल्हापूर ( प्रतिनिधी): अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनेलवर श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त "आमचा कळंबा" हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. हा कार्यक्रम कळंबा गावातील नागरीकांच्या पसंतीस उतरला असून या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन कळंबा गावची संस्कृती,मंदिराचा जिर्णोद्धार,श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या यात्रेचा इतिहास,गावची आध्यात्मिक माहिती, कळंबा गावच्या रूढी- परंपरा,क्रिडा व सांस्कृतीक वाटचालीचा आढावा घेण्याचा प्रयत्न कोल्हापूर ब्रेकिंगचे मुख्य प्रतिनिधी सागर चौगले यांनी केला आहे. या कार्यक्रमामध्ये कळंबा गावातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात आल्या असुन या मुलाखतीतून १९७० सालापासूनचा कळंबा गावचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कळंबा यात्रेनिमित्त प्रथमच कोल्हापूर ब्रेकिंगने एक यशस्वी प्रयत्न केल्यामुळे कोल्हापूर ब्रेकिंग चॅनेलचे कौतुक होत आहे.तर सागर चौगले यांनी देखील कोल्हापूर ब्रेकिंगच्या माध्यमातून यापुढे देखील अनेक चांगल्या विषयावर मालिका सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कोल्हापूरच्या मातीतले, रांगडया भाषेचे आणी कोल्हापूरकरांचे हक्काचे व्यासपीठ असणार्या कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनेलला सबस्क्राईब व फाॅलो करा अस आहवानही सागर चौगले यांनी केले आहे.




Comments
Post a Comment