कोल्हापूरातील माजी विद्यार्थ्यांकडून शेणीदान उपक्रम..
कोल्हापूरातील माजी विद्यार्थ्यांकडून शेणीदान उपक्रम..
कोल्हापूर (प्रतिनिधी): वय वर्ष ६० ते ६५ वयोगटातील विद्यार्थी एकत्र आलेत.. मात्र तरुणांना लाजवेल असा उत्साह, थट्टा- मस्करी,जुन्या आठवणींना उजाळा देत प्रिन्स शिवाजी बोर्डिंग संचलित महाराष्ट्र हायस्कूलच्या सन १९७३-७४ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र हायस्कूलच्या या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पंचगंगा स्मशानभूमीस तब्बल दहा हजार शेणी अर्पण केल्या. त्याचबरोबर मतिमंद मुलांना देखील मदत केली. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणी जाग्या केल्या. यावेळी एकमेकांची आदरपूर्वक विचारपूस करत या माजी विद्यार्थ्यांनी दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. या स्नेह मेळाव्यास शिवसेना महानगर प्रमुख शिवाजीराव जाधव,किशोर पारखे, संजय मंडलिक, कैलास माने, गजानन पोवार, श्रीकांत पौंडकर, रवींद्र साळुंखे,शिरीष साळोखे,किशोर पन्हाळकर यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.



Comments
Post a Comment