कोल्हापूरात रायफल शुटिंग स्पर्धेचा शुभारंभ..
कोल्हापूर शहरशिवसेनेच्या वतीने भव्य रायफल शूटिंग स्पर्धेचा शुभारंभ
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून, कोल्हापूर शहर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, भव्य रायफल शूटिंग स्पर्धा घेण्यात आल्या.या रायफल शूटिंग स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सुरुवात झाली, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे होते, या कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख मंजित माने यांनी केले होते, या स्पर्धेत साधारण 75 स्पर्धकांनी भाग घेतला आहे.ही स्पर्धा 3 दिवस सुरु राहणार आहे.यामध्ये प्रत्येक गटामध्ये एक विजेता निवडला जाणार आहे.ही रायफल शूटिंग स्पर्धा शिवाजी पेठेतील स म लोहिया कॉलेज नजीक पेटाळा ग्राउंड येथील शूटिंग रेंज वर पार पडणार आहे.यावेळी बोलताना संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर म्हणाले, की शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असणारे कार्यक्रम येत्या महिन्यात शिवसैनिक घेणार आहेत,तसेच शहर शिवसेनेच्या वतीने मंजित माने यांनी आयोजित केलेला हा रायफल शूटिंग चा कार्यक्रम खेळाडूंना पाठबळ देणारा आहे, यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेवक दुर्वास कदम,महिला जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुंरे, शहर प्रमुख मंजित माने, विशाल देवकुळे,करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, अवधूत साळोखे, दिनेश साळोखे, चैतन्य देशपांडे,दीपक गौड,कनिष्क शिंदे, स्मिता सावंत,अनिता ठोंबरे,दीपाली शिंदे, सुमित मेळवंकी, धनंजय मेहंदरकर, अक्षय मोरे, आदित्य हुलजी,दिलीप देसाई,हर्षल पाटील,रुपेश रोडे, चंदू भोसले,तृप्ती विभुते,सागर साळोखे आदींसह मान्यवर उपस्थीत होते.


Comments
Post a Comment