वार्ड तिथे शाखा-शिवसेनेच्या उपक्रमाचा धडाक्यात शुभारंभ...


 कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने ताराबाई पार्क येथे शाखेचा शुभारंभ 

 कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवसेनेची शाखा म्हणजे शिवसैनिकांची शान,मान,अभिमान असतो. शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्य केली जातात, लोकांच्या  अडीचणींची निरासरण केले जाते हीच परंपरा अशीच अखंडीतपणे सुरु रहावी अशी अपेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी व्यक्त केली.ते कोल्हापूरातील ताराबाई पार्क येथील शाखेचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.ही शाखा शिवसेना शहर प्रमुख मंजित माने यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आली आहे.याप्रसंगी बोलताना शिवसेनेचे उपनेते संजय पवार म्हणाले, सगळ्या शिवसैनिकांनी  संकटकाळी आपली जबाबदारी समजून एकत्र येणे गरजेचे असुन शाखांच्या माध्यमातुन शिवसेनेचे संघटन मजबुत करणे ही काळाची गरज आहे.तर शहर प्रमुख मंजित माने यांनी येणाऱ्या सहा महिन्यात शहर प्रमुख या नात्याने वार्ड तेथे शाखा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला.यावेळी अनेक पदाधिकार्‍यांना निवडीचे पत्रे देखील देण्यात आली. याप्रसंगी सह संपर्कप्रमुख विजय देवणे, अवधूत साळुंखे,स्मिता सावंत, रीमा देशपांडे, पपू नाईक, शुभम पाटील, राहुल माळी, दीपक गौड, शुभांगी साळोखे, हर्षल पाटील,दीपा शिंदे, महादेव कुकडे,शाखेचे प्रमुख अक्षय माळगे, राहुल जाधव, योगेश देसाई, आदित्य हुलजी, चिन्मय बोकील, अक्षय घाटगे, लतीफ शेख आदी उपस्थित होते.उपस्थीतांचे आभार अभिषेक दाबाडे यांनी मानले.

*कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज पोर्टलवर बातम्या देण्यासाठी -9326499921आणी8483899521या मोबाईल नंबरवर संपर्क करा*



Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...