कै.रामभाऊ दादा चव्हाण फाऊंडेशनच्यावतीने सामाजीक उपक्रम
रामभाऊ दादा चव्हाण यांच्या जयंती निमित्त गरजू रुग्णाला आर्थिक मदत
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्वर्गीय रामभाऊ दादा चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कैलासवासी रामभाऊ दादा चव्हाण फाउंडेशनच्या वतीने गरजू रुग्णाला आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधीलकी जपण्यात आली. 1986 पासून रामभाऊ दादा चव्हाण यांनी कोल्हापुरात शिवसेना पक्ष रुजवला अनेक शाखांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत पकड त्यांनी निर्माण केली होती रामभाऊ दादा चव्हाण यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आज आकरा मे त्यांच्या जयंतीचे औश्चीत्यसाधुन कोल्हापूर शहरातील दोन्ही किडण्या निकामी झालेल्या रोहीत मुसळे या तरुणाला आर्थिक मदतीचा धनादेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आणि अजित चव्हाण यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.यावेळी फाउंडेशनचे संस्थापक आणि नगरसेवक प्रसाद चव्हाण, माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण,फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत दुबल, जय चव्हाण, यश चव्हाण, अभिजीत गायकवाड ,गणेश रांगणेकर, विकास साळुंखे, रोहित माने, अकाराम पाटील,शरद नागवेकर, ज्योतराम जाधव,अमीत सासने यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना नगरसेवक प्रसाद चव्हाण यांनी स्वर्गीय रामभाऊ दादा चव्हाण यांचा सामाजिक वारसा जपत भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. यावेळी कैलासवासी रामभाऊ दादा चव्हाण फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Post a Comment