पार्श्वनाथ को- ऑपरेटिव्ह बँक ग्राहकसेवेत अग्रणी... पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार, बँकेचा २६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..
कोल्हापूर:पार्श्वनाथ को- ऑपरेटिव्ह बँक तत्पर ग्राहकसेवेमधील अग्रणी बँक आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. बँकेच्या २६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले.यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पार्श्वनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेने तत्पर ग्राहकसेवेसाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले. कोल्हापूर जिल्हयामध्ये पहिले एटीएम सुरू करणारी व ३६५ दिवस लॉकरसह अविरत सेवा देणारी पार्श्वनाथ बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज बँक आहे. बँकेने जास्तीत- जास्त शाखा विस्तार करून राज्यामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवावा.
तर,बँकेचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी बॅंकेने सभासद खातेदार यांना उपलब्ध करून दिलेल्या सेवा- सुविधांची माहीती दिली. बँक ग्राहक सेवेमध्ये सदैव अग्रस्थानी असुन रिझर्व्ह बँकेच्या सर्व सुचना व सहकार कायद्यानुसार कामकाज करीत आहे. बॅक निश्चितपणाने ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली असुन सर्वसामान्यांच्या अर्थकारणाला दिशा देण्याचे काम बँकेने केले आहे.यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे माजी संचालक अनिल पाटील, सुहास लटोरे, सत्यजित कदम, माणिकराव पाटील -चुयेकर, सुनिल कदम, प्रताप कोंडेकर, डी. जी. पाटील, विनोद मेहता, विक्रम शहा व सर्व संचालक मंडळ तसेच सभासद, ग्राहक, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.बॅकेचे संचालकांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments
Post a Comment