संजय पाटील यांची शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड...

 संजय पाटील यांची शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड...

कोल्हापूर :  परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष  संजय पाटील यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख  सुजीत चव्हाण यांनी केली. संजय पाटील यांनी गेल्या वीस वर्षात कामगार , शेतकरी ,रेशन ग्राहक यांच्यासह जनसामान्यांच्या प्रश्नांवर लक्षवेधी आंदोलने केलेली आहेत. यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले संजय पाटील  यांच्यासारखा रस्त्यावरची लढाई लढणारा एक लढवय्या आंदोलक पक्षाला मिळाल्यामुळे पक्षाचे बळ वाढणार असून भविष्यात त्यांना मोठी संधी प्राप्त होईल .यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले ,संजय पाटील यांनी भ्रष्टाचाराविरोधात  टोकाची लढाई लढलेली आहे .त्यांचा आक्रमकपणा आणि प्रशासनावरील वचक यामुळे जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल.

यावेळी महानगर प्रमुख शिवाजी जाधव, उत्तर शहर प्रमुख रणजीत जाधव ,माजी नगरसेवक नंदकुमार मोरे ,माजी नगरसेवक अमोल माने, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, नियोजन मंडळ सदस्य अंकुश निपाणीकर, दक्षिण शहर प्रमुख महेंद्र घाडगे, किशोर घाडगे, सुनील जाधव, मंदार तपकिरे ,क्षितिज जाधव ,अनिल कवाळे ,साईराज पाटील ,साताप्पा कांबळे, तानाजी मोरे, महिला प्रमुख मंगल साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...