शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच प्रोत्साहन अनुदान मुख्यमंत्र्यांचे आश्वासन...
कोल्हापूर. दि.21. गोरगरीब नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचे गाजर दाखवण्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे गत वर्षभरात विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली होती.
केवळ मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित असलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या विषयासंदर्भी कोल्हापूर दौर्यावर आलेल्या मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी निवेदन दिले.यावेळी शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान शेतकर्यांनाला लवकरात लवकर द्यावे अशी मागणी करण्यात आली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, अमित पाटील, तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील, उपतालुका अध्यक्ष संजय चौगुले , यतीन होरणे, निलेश आजगावकर, अरविंद कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment