सौ.आंबुबाई पाटील स्कुलचे यश...

 

पंचक्रोशीत नावाजलेली व आपल्या अद्वितीय वैशिष्ट्यांनी ओळखली जाणारी सौ आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल ने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये कनेरी केंद्रात प्रथम क्रमांक तर करवीर  तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला.      सौ आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल ही मिल्र्टी पॅटर्न शाळा असून गेली 24 वर्षे अगदी अल्प शुल्कात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना इंग्रजी मधून शिक्षण देण्याचे काम करीत आहे .  सुसज्ज इमारती आणि निसर्गरम्य वातावरणामुळे येथील शिक्षण आनंददायी वाटते. प्री प्रायमरी पासून बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते. शिक्षणाबरोबरच उत्तम  व कडक शिस्त हे या शाळेचे एक वैशिष्ट्य आहे.  नवी शैक्षणिक धोरणानुसार विविध जीवन कौशल्य विकास साठी पूरक उपक्रमांचे आयोजन स्कॉलरशिप ,जवाहर नवोदय विद्यालय ,सातारा सैनिक पूर्व परीक्षा साठी उत्कृष्ट मार्गदर्शकांत मार्फत खास तयारी वर्ग यासारखे उपक्रम येथे राबवले जातात. पाच दिवसीय मिलिटरी कॅम्पद्वारे आर्मी ऑफिसर्स मार्फत विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले जाते. ज्यामुळे शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे देशसेवेसाठी मिलिटरी मध्ये रुजू झाले आहेत. सुसज्ज अशी प्रयोगशाळा  , विविध संदर्भ ग्रंथांनी सुसज्ज ग्रंथालय विद्यार्थी सहभागातून शालेय परसबागेमध्ये विविध देशी वृक्षांची लागवड व संवर्धन शाळेचे सर्व विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम. मुबलक क्रीडा साहित्य त्याचबरोबर उत्कृष्ट मार्गदर्शकांचे मार्गदर्शन यामुळे क्रीडा क्षेत्रात देखील शाळेने भरघोस यश संपादन केले आहे. शालेय शिक्षणाबरोबरच संस्कृती रक्षणासाठी संस्कृत पाठ गणेश चतुर्थी उत्सव   कार्यक्रम घेतले जातात. विद्यार्थ्यांचे कलागुण जोपासण्यासाठी, त्यांची इतर क्षेत्रांमध्ये रुची वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. या सर्व शालेय व सहशालेय उपक्रमांसोबतच शाळेचे खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या सहभागातून शैक्षणिक साहित्य बनवून त्यातून विविध विषयांचे स्वतंत्र विभाग बनवण्यात आले. विद्यार्थी सहभागातून प्रबोधनात्मक सुविचार, चित्रे ,बोलत्या भिंतींनी सजवलेल्या शालेय परिसरात विद्यार्थी उत्साहाने शिकतो. योग्य  शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षण प्राप्त शिक्षक वृंद, कार्यतत्पर कर्मचारी वर्ग आणि या सर्वांसोबत दिवस रात्र शाळेच्या उत्कृष्टतेसाठी झटणारे प्राचार्य के डी पाटील या सर्वांच्या अथक प्रयत्नातून या शाळेने हे यश संपादन केले आहे.


Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...