विश्वकर्मा जयंती उत्साहात...


कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाच्या वतीनं, विश्वकर्मा जयंती फुलेवाडीतील कालिका मंदिरात संपन्न झाली. पंडित सुतार, किरण सुतार यांच्या हस्ते पूजन आणि आरती करण्यात आली. विश्वकर्मा हे देवतांचे शिल्पकार इंजिनीअर, अभियंता होते. विश्वकर्मा यांनी ब्रह्मांच्या सांगण्यावरून धरती, विश्व राहण्यायोग्य बनवलं, देवतांचा स्वर्ग बनवला, कृष्णाची द्वारका बनवली ,विष्णूचं सुदर्शन चक्र बनवलं, महादेवाचं त्रिशूल बनवलं, रावणाची लंका बनवली अशी माहिती समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी यांनी सांगितली. यावेळी मुरलीधर सुतार, वसंत सुतार, भरत सुतार, विश्वनाथ सुतार, विजय कांडेकरी, राजकुमार सुतार, महादेव सुतार यांच्यासह विश्वकर्मा समाज बांधव उपस्थित होते.


 

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...