सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन गरजेचे - नितीनभाऊ पाटील यांचे प्रतिपादन...
वाठार - वडगाव ता. हातकणंगले येथील स्वामी विवेकानंद विद्यानिकेतन संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. लेन संस्कृतीचे या कार्यक्रमाचे उद्घाटन वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव पाटील, कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष नितीनभाऊ पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी बोलताना नितीन पाटील यांनी मोबाईलच्या युगात युवक,युवतींच्या कलागुणांना व्हाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातुन सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन गरजेच असल्याचे सांगीतले.यावेळी सदानंदगिरी महाराज, गगनगिरी आश्रम राधानगरी संस्थेचे चेअरमन दिलीप शिंदे, प्रल्हाद पाटील, शरद बेनाडे, महेश कुंभार, सागर जाधव, राजेंद्र मोरे तसेच संस्थेचे सर्व संचालक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पालक ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment