रस्त्यावरील खड्यात साजरा केला वाढदिवस...

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी): कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथल्या पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने खराब रस्त्यांच्या विरोधात महापालिकेचा निषेध करत तीव्र आंदोलन करण्यात आले. मंगळवार पेठ येथील बाल संकुल समोर रस्ता रोको करत रस्त्यावर पडलेल्या  खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढून पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे यांनी आपला वाढदिवस  रस्त्यावरील खड्ड्यात मध्ये केक कापून साजरा करत महापालिकेचा निषेध केला. यावेळी महापालिकेच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलनातील महिलांनी  कोल्हापूर नव्हे खड्डेपूर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि  कोल्हापूरातील नागरिकांना खड्डेयुक्त रस्ते देणाऱ्या महापालिकेचे जाहीर आभार, हे हातात धरलेले फलक लक्षवेधक ठरले. यावेळी बोलताना संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांनी महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळेच खड्डेयुक्त कोल्हापूर बनले असून या खड्ड्यांच्या रस्त्यामध्ये प्रवास केल्यामुळे अनेक नागरिकांना मणक्याचा त्रास होत आहे तसेच अनेक लहान-मोठे अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आलं असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर  आपल्या वाढदिवसा दिवशी या खड्ड्यामुळेच आपल्याकडे मैञीणी, पै पाहुणे  आले  नसल्यामुळे या खड्ड्यांमध्येच वाढदिवस साजरा करत असल्याचे सांगितले.या आंदोलनात सरिता सासणे,आरती वाळके,बरखा पाटील,शर्मिला भोसले,विद्या सुतार,गीता भोसले,अंजली पाटील,उषा महिंद्रकर ,अलका कोळेकर,शशिकला गवळी ,शोभा तांबट,मंगल देसाई,सुशीला पोवार,अर्पिता पावले,ज्योती काशिद, छाया पाटील, उज्वला पाटील,पूजा पाटील,सारिका टिपुगडे ,अर्चना पाटील, आनंदी टीपुगडे यांच्यासह महीला सहभागी झाल्या होत्या.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...