शिवराजदादा पाटील सोशल फाऊंडेशनच्या उपक्रमाचे होत आहे कौतुक...

 


कळंबा (प्रतिनिधी): सुर्वे नगर येथील महालक्ष्मी नगर इथल्या पोद्दार स्कूल परिसरामध्ये असणार्‍या महापालिकेच्या दुर्लक्षामुळे एक खुली आरक्षित  जागा वर्षानुवर्ष पडून राहिल्यामुळे या जागेला अक्षरशा कोंडाळ्याचे स्वरूप आलं होतं. यामुळे परिसरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोकाही वाढला होता .ही बाब लक्षात घेऊन सुर्वेनगर येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार कांबळे यांनी शिवराजदादा पाटील  सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्वखर्चातुन जेसीबीच्या सहाय्याने या जागेची साफसफाई करून परीसरातील जेष्ठ नागरिकांसाठी  विरंगुळा केंद्राची निर्मीती केली आहे, तसेच या ठिकाणी सुसज्ज बैठक व्यवस्था ही करण्यात येणार आहे.या जागेच्या सफाई मोहीमेच्यावेळी प्रकाश डिगे, रामचंद्र हालके, उत्तम जाधव, धनाजी पाटील, बजरंग देसाई ,प्रीतम फंगे, विश्वजीत लगाडे, प्रल्हाद देसाई, चंद्रकांत देवर्डेकर, राजेंद्र रेपे,राकेश फराकटे, विनायक पाटील, संभाजी खुळे, योगेश हजारे, प्रकाश चव्हाण यांच्यासह महालक्ष्मी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. वर्षानुवर्षे पडून राहिलेली खुली आरक्षित जागेची शिवराजदादा पाटील सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून साफसफाई होऊन या ठिकाणी सुसज्ज बैठक व्यवस्था करण्यात येणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्यातून या सामाजीक उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...