राणी गायकवाड यांची भाजप महीला मोर्चाच्या जिल्हा सदस्यपदी निवड.

 

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक  कैलासवाशी संतोष गायकवाड यांच्या पत्नी श्रीमती राणी संतोष गायकवाड यांची भारतीय जनता पार्टीच्या महानगर जिल्हा महिला मोर्चाच्या सदस्य पदी निवड करण्यात आली. त्यांचा पक्षातील सक्रिय सहभाग व त्यांचे सामाजिक कार्य पाहून ही निवड करण्यात आल्याचे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम यांनी सांगितले.तर यावेळी बोलताना राणी गायकवाड यांनी पक्षाची ध्येय धोरणे व भाजप सरकारने केलेली विकास कामाची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले. गायकवाड यांच्या निवडीला भाजपच्या महीला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा सरिता चौगले यांचे विशेष सहकार्य लाभले. निवडीचे पत्र  समारंभ पूर्वक जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम यांच्या हस्ते राणी गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी वंदना बबलवार,रीमा पालणकर,अलका देसाई, रूपाली आगळे, सीमा पालकर, शारदा पोटे, वैशाली पवार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...