सौ.सरीता चौगले यांची निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी): माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या शहर उपसंघटीका म्हणून सौ. सरिता सागर चौगले यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय कायदे तसेच माहिती अधिकाराचा प्रचार व प्रसाराचे काम ही संघटना करत असते. तसेच नागरिकांच्या वर अनेक शासकीय - निम शासकीय कार्यालयांमध्ये काही वेळा अन्याय होत असतो अशा वेळी माहीतीच्या अधिकाराचा वापर करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संस्था कार्यरत असते.कोल्हापूरातील सामाजीक कार्यकर्त्या सरीता चौगले यांच्या सामाजीक कार्याची दखल घेत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी सरिता चौगले यांची कोल्हापूर शहराच्या उप संघटिका पदी निवड केली आहे. या निवडीसाठी राणी गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले.

Comments
Post a Comment