सरीता सासने यांचा श्रम भुषण पुरस्काराने सन्मान.

 

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापुरातील शिवाजीपेठ येथील सामाजिक कार्यकर्त्या व पद्माराजे महीला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे यांना श्रम फाउंडेशनच्या वतीने 'श्रम भुषण पुरस्कार' देऊन गौरवण्यात आलं. देशाचे पहिले सुवर्णपदक विजेते आणि अर्जुन पुरस्कार विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांच्या हस्ते सासने यांना गौरविण्यात आले. सरिता सासने यांचा अनेक सामाजिक कार्यातील सहभाग,त्यांचे संघटन कौशल्य व  संस्कृतिक क्षेञातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.कार्यक्रमाचे निवेदन अनिता घाटगे यांनी केले.यावेळी श्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष कमलाकर सारंग , सचिव वैशाली सारंग,विजय ककडे,भारत खराडे,सुनिल नागावकर,विद्यासागर पाटील, बाजीराव नाईक , पदमाराजे महिला संघटनेच्या  सुषमा सावंत , छाया पाटील, अलका कोळेकर , हेमलता देसाई, श्रुती मिस्त्री यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते.


Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...