समरजीत घाटगे करणार भाजपमध्ये प्रवेश..


 कागल( प्रतिनिधी ) : कागल तालुक्यातील नेते समरजीत घाटगे यांची  घर वापसी होणार असुन,भाजपमध्ये पुन्हा प्रवेश  करणार असल्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.मंञी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कागल विधानसभेची निवडणूक लढवली होती.विधानसभेला पराभुत झाल्यानंतर समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहीती समोर येत असुन ऑगष्ट महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.उच्च व तंञ शिक्षण मंञी चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने समरजीत घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे खाञीलायक वृत्त आहे.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...