पद्माराजे महिला संघटनेचे आगळे वेगळे रक्षाबंधन..
कोल्हापूर :- कोल्हापूरातील शिवाजीपेठ येथील पद्माराजे महीला संघटनेच्यावतीन मंगळवारपेठ येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयातील पशु संवर्धन सहाय्यक आयुक्त डाॅक्टर सॅम लुद्रिक आणी कर्मचारी शिवाजी सावर्डे,रमेश मोरे,रविंद्र गवळी,सोनाली करपे,शकुंतला माने यांना राखी बांधुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने रक्षा बंधनाचा सन साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना संघटनेच्या अध्यक्षा सरीता सासने यांनी कोल्हापूर शहरातील अनेक मुक्या प्राण्यांना जीवदान देणारे पशु वैद्यकीय डाॅक्टर व कर्मचारी दुर्लक्षीतच आहेत.एखाद्या घरातील पाळीव प्राणी म्हणजे कुञा,मांजर,म्हैस,गाय,बैल हे घरातले सदस्य असल्यासारखेच असतात.ते आजारी पडले तर या मुक्या प्राण्यांवर उपचार करुन त्यांना जीवदान देण्याचे पुण्याचे काम हे कर्मचारी व डाॅक्टर करत असतात, एवढेच न्हवे शहरात अनेक वेळा जखमी माकड,विविध प्राणी- पक्षी आढळतात त्यांना देखील जीवदान देण्याच काम पशु वैद्यांकडून होत असते.माञ यांच्या कार्याची दखल म्हणावी तशी घेतली जात नाही.म्हणुनच त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणी त्यांच्या हातुन होणार्या प्राणी रक्षणाची जाणीव सर्वांना व्हावी या उद्देशान आम्ही त्यांना राखी बांधुन त्यांच्या हातुन यापुढेही प्राणी रक्षणाचे कार्य अखंडपणे घडत राहो ही सदिच्छा व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अस सांगीतले.यावेळी पद्माराजे संघटनेच्या सचिव आरती वाळके,सरीता सासने,कार्याध्यक्षा स्मिता हराळे,सदस्या उषा महिंद्रकर,अलका कोळेकर , अर्पिता पावले ,बबिता जाधव, अंजली पाटील,पुनम देशमुख उपस्थित होत्या.

Comments
Post a Comment